माहितीबाजार हाच माझा आधार.
- मनीष अनंत खराडे येवला

नमस्कार, मी मनीष अनंत खराडे येवला येथील माहिती बाजार संचालक.
अस म्हणतात कि देव जीवनात प्रत्येकाला एक संधी देतो. ती संधी मला माहितीबझार या रूपाने भेटली आणि खरोखर तरलो कारण मी जेव्हा सेनापती स्वयंरोजगार व नोकरी मार्गदर्शन केंद्र हि फर्म विद्यार्थ्यांसाठी उघडली तेव्हा मी इतक्या सुविधा देऊनही माझे दुकानाचे भाडेही मी मिळवू शकलो नाही.

पण जेव्हा मी आपली माहिती बाजार चे माहिती बझार केंद्र मिळवले तेव्हा माझे नशीब पालटल्या सारखे झाले. माझी फर्म हि फक्त माहिती बाजार यासाठीच उघडली होती याचा मला पूरेपर अनुभव आला. एक माहिती पत्रक १० रु याप्रमाणे दिवसाकाठी २० माहितीपत्रक कसेही विकले जातात. म्हणजे २०० रुपये. त्यापेक्षाही जास्त विकले जातात फक्त माहितीपत्रक विक्रीतच माझे भाडे व एक माणसाचा पगार निघतो. बाकी फॉर्म ऑनलाईन भरणे pan सुविधा हे सगळे वेगळे.

सगळ्यात महत्वाचे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्याचे कारण अतिशय कठीण काळात माहितीबाजार ने मला मदत केली अशाप्रकारे. मला गेले एक वर्षापासून अतिशय बिकट आजाराने ग्रस्त केले आहे. माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून मला आठवड्यातून दोनदा डायलीसीस चालू आहे. ह्या परिस्थितीत फक्त मी बैठे काम करू शकतो. आणि मला बराच खर्च हि चालू आहे. अशा परिस्थितीत आपल्या सेंटर मुळे इतका आधार मिळाला कि मला पैशांची उणीवच होऊ दिली नाही. मी पूर्ण वेळ काम करू शकतो.मला कधीच कोणापुढे मदत मागण्याची गरज पडत नाही.

मी माझी पत्नी,मुले आई वडील सर्व जण तुमचे मनापासून खूप खूप खूप आभारी आहोत. धन्यवादमाहितीबाझार वरील प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते .
- अतुल अशोक भालेराव, हडको औरंगाबाद

मी अतुल अशोक भालेराव, संचालक, वरद कॉम्प्युटर्स टीव्ही सेंटर,हडको औरंगाबाद.
मी माहितीबाझार संस्थेशी साधारण २०१६ रोजी जोडला गेलो आणि व्यवसायाची दिशाच वळाली. प्रगतीचा ओघ जसा वाहु लागला. माहितीबाझार ने जसे माहितीला विभागले आहे ते कौतुकास्पद आहे.

अ‍ॅडमिट कार्ड, एज्युकेशन, मल्टी सर्व्हिसेस , बिल पॉईंट, नौकरी सारांश या विभागणीमुळे सर्व सामान्यांना माहिती देणे सोयीस्कर जाते. कोणतीही जाहिरात शोधावी लागत नाही कारण प्रत्येक जाहिरातीला स्वतंत्र नंबर आहेत. बऱ्याच इतर जाहिरात देणाऱ्या पोर्टल वर जाहिरातीची शहानिशा न करताच जाहिरात पोर्टलवर पाहावयास मिळते. परंतु माहितीबाझार वरील प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवात एकदा सुद्धा कोणत्याही जाहिरातीत त्रुटी आढळुन आली नाही.

“ माहितीबाझार ” सारख्या अचूक आणि खात्रीदायक माहिती देणाऱ्या माहिती पोर्टल बरोबर काम करून आनंद तर मिळतोच आणि आपण विद्यार्थाना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचे उज्वल भविष्य घडविण्याचे काम आपल्या हातून घडते यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे.

धन्यवाद “माहितीबाझार ” आणि “ डिजिटल इंडिया ”.ठिकाण एक सेवा अनेक
- श्री लेंगरे धुळूबा सुखदेव, जेउर, करमाळा, सोलापूर

मी माहितीबाजारच्या परीवारामध्ये ४ वर्षापासून आहे.
व्यवसाय प्रत्येकजण करतोच. योग्य मार्गदर्शक मिळाल्यानंतर व्यवसायात जो बदल होतो. तो मी माहितीबाजार कडून अनुभवला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तत्पर आणि विनम्र सेवा.
व्यवसायाबरोबरच त्यांनी माहितीबाजार हा एक आपला परीवार तयार केला आहे. आपणास अवघड वाटणाऱ्या खूप गोष्टी अतिशय सोप्या पध्दतीने आपणास ते सोडवून देतात.
सर्वच शब्दात मांडणं शक्य नाही. थोडक्यात ज्यांचेकडे माहितीबाजार आहे ते निश्चितच यशस्वी होणारचं. त्यांच हे टीमवर्क असचं प्रगतीपथावर राहणार आहे.

सर्व टीमचे मन:पूर्वक धन्यवाद.माहितीबाझार म्हणजे खरंच हा एक माहिती चा खजीनाच आहे
- संतोष चंद्रपटाले,बीड

माहितीबाझार म्हणजे खरंच हा एक माहिती चा खजीनाच आहे विशेष म्हणजे
माहितीबाझारचे जे कर्मचारी ( STAFF) यांना प्रथम मी अभिवादन करतो कारण आम्ही जेंव्हा त्यांना एखादी माहिती विचारतो तेंव्हा ते लगेच सांगतात काम करते वेळेस असे वाटत कि आपल्या सोबत म्हणजेच आपल्या पाठीशी कोणीतरी आहे.

मी पहिले नोकरी संधर्भातील फॉर्म भरतेवेळेस मनात घाबरत असे फॉर्म मध्ये काही चुकेल. परंतु आता असे वाटते आहे माहिती बाझार आपल्या सोबत आहे.Thank You Very Much Sir
-राम नदंवंशी ,अकोट, अकोला

R/sir, Sir,
आज मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि मी मागील ३ वर्ष पासून आपल्याशी जुडलो अहो
या तीन वर्ष आपल्या सहकार्य मुले मला एवढी प्रगत मिळाली कि आज मी आपण दिलेली सहकार्य मुले पुऱ्या तालुक्यात गाजू शकलो सर्व इकडे नाव कमवू शकलो आज माझी हि परिस्थीती आहे कि कोणताही अर्ज असो कि ऑनलाईन फॉर्म असो माझे कडे मिळतोच या खात्री मुले लोक माझेवर भरवसा करून माझे पर्यंत येत आहे आणि मी पण आपले सहकायाने त्या सर्व पुरवू शकत अहो.

अश्या अनेक बाबतीत मी पुढे आलो त्या साठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा साथ अँड आपला आशीर्वाद माझेवर राहू द्या अशी आपल्या कडे इच्छा बाळगतो .....भविष्यामधील सर्व सुविधांचा आधीच विचार केला आहे.
- हर्षवर्धन विठ्ठल घाडगे ,तासगाव, सांगली

1. माहितीबाझार मधील सुविधांचा फायदा होतो का?
- होय
2. माहितीबाझार मुळे अंदाजे महिना किती रूपयांचा व्यवसाय होतो?
- 25000
3. माहितीबाझार मुळे आपल्या उत्पन्नात वाढ झाली का ?
- खूप
4. माहितीबाझार मधील कोणत्या सुविधांचा तुम्हाला सर्वाधिक फायदा होतो?
- नोकरभरती विषयक जाहिराती
5. माहितीबाझार मधील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली?
- माहितीबाझार ची सर्व सेवा व टीम खूप सहकार्य करते. माहितीबाझार इज बेस्ट
6. माहितीबाझार मध्ये भविष्यात कोणत्या सुविधा दिल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल?
- माहितीबाझार ने भविष्यामधील सर्व सुविधांचा आधीच विचार केला आहे.
7. इतर काही माहिती द्यावयाची असल्यास –
- असेच सहकार्य आम्हा नव उद्योजकांना लाभो हि विनंती

अभिप्राय - हर्षवर्धन विठ्ठल घाडगे ,तासगाव, सांगली धन्यवादमाहितीबाजार म्हणजे सर्व गुण संपन्न.
- श्री गणेश म. सोंडकर, श्री सायबर कॅफे व झेरॉक्स, शेगाव. जिल्हा बुलडाणा

नमस्कार सर,
आज मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि, माहितीबाजार टीमने आम्हा केंद्र चालकांचा अभिप्राय मांडायची संधी दिली. आपल्याबद्दल काय बोलाव हेच कळत नाही. आपल माहितीबाजार म्हणजे सर्व गुण संपन्न, सर मी आपल्या माहितीबाजार टीम सोबत मागील तीन वर्षा पासून जुळ्लेलो आहे.
मला ऑनलाइन फॉर्म भरता वेळेस काहीही अडचण आल्यास तुम्ही मला प्रत्येक वेळेला मदत करायचे. आपल्याशी निगडीत असलेल्या सेवाच नाहीतर, तेच्या व्यतिरिक्त कोणतीही अडचणी आल्यास, तरी सुद्धा तुम्ही मदत करायचे. हीच तर असते आपल्या माणसांची ओळख. सर मी ज्या वेळेला सायबर कॅफे सुरु केल, त्यावेळेला ऑनलाइन फॉर्म भरायल मी घाबरायचो, माझ्या मनात शंका रहायची कि, माझ्याकडून फार्म तर नाही चुकणार, माझ्या हातून विद्यार्थ्याचे नुकसान तर नाही होणार, पण मला विश्वास होता आपल्या माहितीबाजार टीमने तयार केलेल्या माहितीपत्रकावर. ते माहितीपत्रक वाचल्या नंतर मी फार्म अगदी सहज भरायचो. हि हिम्मत मला माहितीबाजार टीमकडून मिळाली.
आपल माहिती पत्रक म्हणजे मला एक प्रकारच तुमच्या कडून मिळालेलं वरदान, अगदी सरळ, सोप व अचूक आपल्या मराठी भाषेत बनवलेल. जी मूळ जाहिरात २५ ते ३० पानांची असते ती जाहिरात तुम्ही १ ते २ पानांवर सहज तयार करून देता, यामुळे आमच भरपूर वेळ वाचतो,

सर,आपल्या माहितीबाजारच्या टीममुळेच मी माझ्या उद्योगात गरूढ झेप घेतली. व दोन वर्ष्याच्या आतच्या कालावधीत माझ्या मालकीची ३१ लाखाची दुकान घेतली. हे बळ मला तुमच्यामुळेचतर आल. मी सदैव तुमचा ऋणी आहे.माहिती बाझारने चांगल्या सुविधा दिल्या बद्ल धन्यवाद
- विजय कॉम्पुटर, मालेगाव, नाशिक

नमस्कार,
मी विजय नवले सर्वप्रथम माहितीबाजार चे धन्यवाद देतो कि, गेल्या काही महिन्यापासून मालेगाव शहरात नोकरी विषय जाहिरात पसरत गेली आणि माहितीबाजार च्या पाठोपाठ विजय कॉम्पुटर हे नावं लागत गेले माझ्या कामाचा वेग वाढवला असेल तर तो माहितीबाजारमुळे खूप काही सरकारी नोकरी माहिती हि लोकांना मिळत गेली आणि माहिती बाजार केंद्रा मुळे माझा व्यवसाय वाढत गेला.

माहितीबाजार कर्मचारी व संस्थापक यांना खूप खूप धन्यवाद देतो.माहितीबाझार टीम कडून मिळणारी मदत खूप कौतुकास्पद आहे
- धनंजय दिलीप सूतार , बार्शी , सोलापूर

माहितीबाजार टीम नमस्कार ,
गेली पाच वर्षे झाली मी माहितीबाझार चे पोर्टल चालवत आहे.पोर्टल चालू केल्या पासून मला माहितीबाझार टीम कडून मिळणारी मदत खूप कौतुकास्पद आहे.

माहितीबाझार टीम ला माझ्या कडून कूप खूप शुभेच्छा....मी आणि माझे माहिती बाझार.
- बापू विजय नवले, केडगांव, दौंड, पुणे

मी आणि माझे माहिती बाझार,
पाच ते सहा वर्षांपासून माहिती बाझारचा सदस्य आहे अत्यंत तत्पर सेवा व अचूक माहिती या जोरावर वेळ वाचवणारी संकल्पना आपण मांडली ती पुरेपूर आमच्या सारख्या सेंटर पर्यंत पोहचवली त्यामुळे आमचे सेंटर परिसरातील अत्यंत तत्पर सेवा व अचूक माहिती देणारे सेंटर म्हणून नावारूपास आले याचे पूर्ण श्रेय मी माहिती बाझार टीमला देईल.
व्यवसायातील प्रत्येक दिशा देण्याचे काम सचिन सरानी मला केले आहे त्यामुळे मी त्यांचाही सदैव ऋणी आहे .माहिती बाझारची उत्तोरत्तर प्रगती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आमच्या वर काही जबाबदारी दिल्यास तीही आम्ही पार पाडू.

माहितीबाझार ला पुढील वाटचालीस शुभेच्या !सरकारी नौकरी चे महाराष्ट्रातील एकमेव विश्वासु केंद्र.
-श्री बाळासाहेब अंगदराव दहिफळे, सिरसाळा, ता . परळी , ज़िल्हा बीड

माहितीबाजार हे सरकारी नौकरी चे महाराष्ट्रातील एकमेव विश्वासु केंद्र !! ,
आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळी नौकरी माहिती केंद्र आहेत पण आपल्या माहितीबाजार चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे
१. फोन केल्याबरोबर अडीअडचणी सोडवून आपल्या ग्राहकाला मदत करणारे पहिले केंद्र आहे .
२. सर्वाना सहकार्य करणारी सर्व गुणवंत टीम असल्यामुळे पहिल्यांदा सर्व टीम चे जाहीर आभार .
३. अचूक मराठी भाषांमध्ये माहितीपत्रक असल्यामुळे १००% अचूक माहिती सर्वाना समजते त्यामुळे माहितीबाजार हे सर्वांचे विश्वासू केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे .
४. अनेक मल्टीसर्व्हिसेस च्या सेवा उपलब्ध करून दिल्या मुळे माहितीबाजार विषयी अनेकांना आवड निर्माण झाली आहे व ऑनलाईन चे काम सोपे झाले आहे

या सर्व सेवा व्यवस्थित माहितीबाजार देत असल्यामुळे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात आणखी महत्व वाढेल अशी अश्या करतो . आपला विश्वासूआपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते.
-योगेश गजानन ताठे, ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणा

नमस्कार सर,
खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो ! मि बुलडाणा जिल्ह्यातील माहितीबाझार संचालक योगेश गजानन ताठे (ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणा) आपले मनापासून खूप खूप आभार मानतो. आपण आमचा वेळ वाचून अधिक पैसा कमवण्याचे साधे व सोपे पोर्टल विकसित करून आम्हाला उपलब्ध करून दिले त्या बदल आपल्या सर्व माहितीबाझार टीमचे खूप आभार मानतो.
तुमच्या मुळे आमचा एक मोठा फायदा म्हणजे * मराठी माहितीपत्रक * अचूकतेची हामी * एकत्रित टेबल* नवनवीन संकल्पना * फोन वर मिळणारी मदत * महत्वाच्या सूचना * वेबसाईट ची रचना एक विनंती करतो आशीच कृपा आमच्यावर असुद्या जेणेकरून तुमच्या मुळे आमचे नाव जिल्ह्यात एक नंबर असेल लोकांचा विश्वास आमच्यावर असेल.

पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!

Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102